प्र.१. अचूक सहसंबंध ओळखा
(A: विधान, R कारण )
१ ) A सुपीक मैदानी प्रदेशांत दाट लोकवस्ती आढळते.
R सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
२) A प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही.
R: जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : आ) केवळ R बरोबर आहे.
३) A दुसन्या टप्प्यात मृत्युदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R दुसर्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तर : इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
प्र. २ टीपा लिहा.
१) भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव
उत्तर : जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे आणि या वितरणावर विविध प्राकृतिक घटकांचा प्रभाव पडतो. त्यांपैकी भूरचना किंवा प्राकृतिक रचना या घटकांचा लोकसंख्या वितरणावर विशेष प्रभाव पडतो. सर्वसाधारणपणे भूरचनेचे किंवा प्राकृतिक रचनेचे पर्वत, पठार, मैदान, वाळवंटे आणि बर्फाच्छादित प्रदेश असे विभाग दिसून येतात. यांपैकी किनारपट्टीची आणि नदीची मतदान ही लोकसंख्येच्या केंद्रीकरणाला पोषक असतात. पाण्याची उपलब्धता, सुपीक मृदा, सपाट प्रदेशामुळे वाहतूक सुगमता, शेती आणि तत्सम व्यवसायांची भरभराट या प्राकृतिक रचनेच्या प्रदेशात सहजतेने होते. त्यामुळेच जगातील बहुतांशी जास्त लोकसंख्येचे प्रदेश हे एक तर किनारपट्टीच्या प्रदेशात आहेत किंवा नदी खोऱ्यांमध्ये आढळतात.
या तुलनेत ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश, तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश आणि उष्णकटिबंधीय वाळवंटी प्रदेश येथे मात्र लोकसंख्या विरळ आढळते. ग्रीनलँड, कॅनडाच्या उत्तरेकडचा प्रदेश रशियातील सायबेरियाच्या हिमालय पर्वतीय प्रदेश, कलहारी, सहारा, ऑस्ट्रेलियाचे मध्य वाळवंट या वाळवंटी प्रदेशांत लोकसंख्या फारच कमी आढळते.
अशाप्रकारे प्राकृतिक रचनेचा लोकसंख्या वितरणावर प्रभाव पडतो.
२) जन्मदर आणि मृत्युदरातील सहसंबंध.
उत्तर : जन्मदर आणि मृत्युदरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते. मात्र, लोकसंख्येतील ही वाढ किती होणार आहे की लोकसंख्येत घट होणार आहे ही बाब जन्मदर आणि मृत्युदरातील तफावतीवर अवलंबून असते, जन्मदरआणि मृत्युदर दोन्ही जास्त असल्यास लोकसंख्या कमी असते, तसेच स्थिरही असते. जन्मदर जास्त मात्र मृत्युदर घटत असल्यास लोकसंख्या वाढत जाते. जन्मदर जास्त व मृत्युदर कमी या टप्प्यात लोकसंख्येत प्रचंड वाढ होते, हीच लोकसंख्या स्फोटाची स्थिती असते. जन्मदर घटत असल्यास आणि मृत्युदर कमी होत असल्यास लोकसंख्येत अत्यल्प वाढ होते आणि पुढे पुढे लोकसंख्या स्थिर होत जाते. जन्मदर खूप कमी आणि मृत्युदरही खूप कमी असल्यास लोकसंख्या कमी असते, मात्र ती स्थिर असते. काही वेळेस तर जन्मदर कमी आणि मृत्युदर जास्त अशी परिस्थिती उद्भवते आणि तेव्हा त्या देशाची किंवा प्रदेशाची लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होत जाते. त्यालाच लोकसंख्येची नकारात्मक वाढ असेही म्हणतात.
३) लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा.
उत्तर : लोकसंख्या संक्रमणातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा जन्मदर व मृत्युदर यात खूप मोठा फरक पडत जातो तेव्हा तिसऱ्या टप्प्यात मृत्युदर आणखी कमी होत जातो. मात्र त्याच वेळेस जन्मदरह = कमी होत जातो. देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो, लोकांचे उत्पन्न वाढते, त्यांचे राहणीमान उंचावते, तंत्रज्ञानाचा विस्तार होतो तेव्हाच शैक्षणिक पातळी उंचावते. द्वितीय व तृतीय व्यवसायाचा विस्तार होतो आणि लोकांनाही कुटुंबनियोजनाचे महत्त्व पटल्यामुळे जन्मदर अजून कमी होत जातो. तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या भागात विकसनशील देशांचा विकसित देशाकडचा प्रवास सुरू होतो आणि म्हणूनच लोकसंख्या संक्रमणातील हा सगळ्यांत महत्त्वाचा टप्पा असतो.
प्र. ३. भौगोलिक कारणे लिहा.
१) भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
उत्तर : भारताचा मृत्युदर दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढणारे उत्पन्न, उंचावलेले राहणीमान, तंत्रज्ञानाचा विस्तार यांमुळे मृत्युदर दिवसेंदिवस कमी होत आहे. याच दरम्यान भारताच्या लोकसंख्येचा जन्मदर कमी होत असला, तरी मृत्युदर च्या तुलनेत जन्मदर कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भारताच्या जन्मदर व मृत्युदरातील ही तफावत वाढत असून, भारताची लोकसंख्या सतत वाढत आहे. म्हणजेच भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
२) लोकसंख्या वितरण असमान असते.
उत्तर : जगातील प्रत्येक देशाची भौगोलिक रचना, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता इत्यादी प्राकृतिक घटकात विविधता आढळून येते. लोकसंख्येच्या वितरणावर या सर्व घटकांचा प्रभाव पडतो. ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल असतात तिथे लोकसंख्या जास्त, तर ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक प्रतिकूल आहेत तेथे लोकसंख्या कमी आढळते. नदीची सुपीक मैदाने, किनारपट्टीचे प्रदेश आल्हाददायक हवामान अशा अनुकूल परिस्थितीत लोकसंख्या जास्त असते. मात्र त्याच वेळेस जगातील काही प्रदेशात तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश, अतिशीत किंवा अतिउष्ण प्रदेश, सदैव बर्फाच्छादित प्रदेश किंवा पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारे वाळवंटी प्रदेश आहेत तेथे साहजिकच लोकसंख्या कमी आढळते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जगातील लोकसंख्या वितरण असमान असते.
३) वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.
उत्तर : वाहतुकीच्या सोयींमुळे विविध स्वरूपाची साधनसंपत्ती आणि लोकांची ये जा सुलभ होते. त्यामुळे विविध व्यवसायांनाही प्रोत्साहन मिळते. सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमिप्रदेशांचा शोध लागला. बंदरांचा विकास झाला. थोडक्यात, वाहतुकीच्या सोयींमुळे प्रदेशाच सुगमता वाढते, नागरीकरणाला चालना मिळते. त्यामुळे वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते.
४) लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते..
उत्तर : लोकसंख्येच्या संक्रमणाच्या आरंभीच्या टप्प्यानंतर विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार होतो. त्यामुळे रोगराईवर मात होते आणि मृत्युदरामध्ये हळूहळू घट होत जाते. मात्र, त्याच वेळी जन्मदर स्थिर राहिल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढते. वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीबरोबरच इतर उदयोगांचीही वाढ होते. शेती आणि शेती आधारित इतर उद्योगांची वाढ होते. त्याचबरोबर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते आणि त्यातूनच द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते. लोकांचे राहणीमान उंचावर्त, गरिबी कमी होत जाते आणि प्राथमिक व्यवसायापेक्षा द्वितीय आणि तृतीय व्यवसायांची वाढ होते.
५) जन्मद्र कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते.
उत्तर : लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात जन्मदर अजून कमी होत जातो. मात्र, असे असले तरी या कालखंडात लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे असते. देशाची आर्थिक स्थिती सुधारते. लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात. मात्र, याच वेळेस मृत्युदरही खूप कमी झालेला असतो आणि त्यामुळे या टप्प्यात जन्म दर कमी असूनही मृत्युदर त्याहीपेक्षा कमी असल्यामुळे लोकसंख्या वाढते. मात्र, ही वाढ खूपच अल्प किंवा कमी असते.
६) लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते.
उत्तर : लोकसंख्येच्या अभ्यासात एखाद्या प्रदेशाची निव्वळ लोकसंख्या प्रादेशिक तुलनेसाठी वापरणे योग्य ठरत नाही. याला कारण प्रत्येक देशाचे क्षेत्रफळ हे वेगळे असते आणि त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणात प्रादेशिक तुलनात्मक अभ्यासासाठी क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर मोजणे अत्यावश्यक ठरते. लोकसंख्या घनता म्हणजे प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्या यांचे गुणोत्तर होय. म्हणजेच एकूण लोकसंख्येला एकूण क्षेत्रफळाने भागल्यास जी संख्या येते ती त्या प्रदेशाची लोकसंख्या घनता दर्शवते. थोडक्यात, लोकसंख्या घनता ही संख्या नसून ती त्या प्रदेशाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.
प्र. ४. सविस्तर उत्तरे लिहा.
१) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते ?
उत्तर : ज्या प्रदेशात मानवी वस्तीला अनुकूल परिस्थिती असते अशा प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते, याउलट ज्या प्रदेशात मानवी वस्तीला फारशी अनुकूल परिस्थिती नसते अशा प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. लोकसंख्येचे असमान वितरण कोणत्याही एका घटकामुळे होत नसते, तर ते अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे घडून येत असते.
जगातील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक पुढीलप्रमाणे आहेत :
(१) प्राकृतिक रचना किंवा भूरूपे : सपाट प्रदेश शेतीला अत्यंत उपयुक्त ठरतो. तेथे शेतीसाठी कालवे काढणे, रस्ते तयार करणे, लोहमार्ग बांधणे, कालव्यातून जलमार्ग तयार करणे सोपे जाते; म्हणून सपाट मैदानी प्रदेशात शेती व कारखाने विकसित होतात. त्यामुळे सपाट मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती असते. म्हणूनच नाईल, मिसिसिपी, यांगत्से, तसेच भारतातील गंगेच्या मैदानात दाट लोकवस्ती आहे.
पर्वतीय प्रदेशात तीव्र उतार असतो. अशा प्रदेशातील काही निवडक जागी पाण्याची उपलब्धता असते, त्यामुळे तेथे लोकवस्ती आढळते. तीव्र उतारामुळे डोंगराळ पर्वतीय प्रदेश शेतीच्या व्यवसायात फारसा उपयुक्त ठरत नाही. तेथे शिकार, लाकूडतोड, शेळ्या-मेंढ्या पाळणे यांसारखे प्राथमिक व्यवसाय अगदी मर्यादित स्वरूपात चालतात. तसेच तेथील थंड हवामान मानवाला प्रतिकूल असते म्हणून तेथे लोकसंख्या कमी आढळते...
थोडक्यात, प्राकृतिक रचनेचा विचार करता, सपाट मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त, तर तीव्र उताराच्या डोंगराळ पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते.
(२) हवामान : हवामानाचा परिणाम विशेषकरून लोकसंख्येच्या घनतेवर होतो. अतिशय प्रतिकूल हवामान असलेले अतिउष्ण, अतिथंड, अति पावसाचे किंवा अति कोरड्या प्रदेशात लोकसंख्या विरळ असते. कारण असे प्रदेश लोकवस्तीस अनुकूल नसतात. उदा., सैबेरिया, अंटार्क्टिका यांसारख्या अतिथंड हवामान असलेल्या प्रदेशात लोकवस्ती आढळत नाही किंवा अतिशय विरळ प्रमाणात आढळते. सहारा, कलहारी यांसारख्या कोरड्या आणि अतिउष्ण वाळवंटी प्रदेशातही विरळ लोकवस्ती आढळते. तसेच उष्ण व दमट हवामान असलेल्या विषुववृत्तीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. याउलट जेथे ऋतुमानाप्रमाणे हवामान फारसे बदलत नाही अशा सम आणि उबदार हवामान असलेल्या समशीतोष्ण प्रदेशात, तसेच मान्सून हवामानाच्या प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.
(३) पाण्याची उपलब्धता : मानवी वसाहत निर्माण होण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला घटक म्हणजे पाणी होय. मानव, प्राणी व वनस्पती हे पाण्यावाचून जगू शकत नाहीत. तसेच मानवाला घरगुती वापरासाठी, शेतीसाठी, पशुपालनासाठी व कारखान्यांसाठी पाणी अत्यंत आवश्यक असते. थोडक्यात, जेथे पुरेसा व नियमित पाणीपुरवठा असतो अशा प्रदेशात दाट लोकवस्ती असते. नद्यांची खोरे, तसेच किनारपट्टी प्रदेश, नद्यांचा मैदानी प्रदेश येथे दाट लोकवस्ती आढळून येते. उदा., नाईल नदीचे खोरे. भारतीय किनारपट्टीचा प्रदेश, तसेच भारतीयगंगा, यमुना नदीचा प्रदेश, वाळवंटातही मरूदयान परिसरात किंवा हिरवळीच्या प्रदेशात जेथे पाणी उपलब्ध असते तेथे लोकसंख्या केंद्रित झालेली आढळून येते.
(४) मृदा : मानवाची अन्नाची प्राथमिक गरज ही प्रामुख्याने शेती उत्पादनातून भागवली जाते आणि शेती ही मुख्यतः मृदेच्या सुपीकतेवर अवलंबून असते. नदयांच्या खोऱ्यातील गाळाच्या सुपीक जमिनीत शेती चांगली होते. म्हणूनच ईजिप्तमधील नाईल, भारतातील गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रेच्या सुपीक प्रदेशांत, तसेच मिसिसिपी, यांगत्से या नद्यांची पूरमैदाने येथे लोकसंख्या अतिशय दाटीने केंद्रित झालेली आढळून येते. यांशिवाय रेगूर किंवा काळी मृदा असलेले प्रदेश तसेच अग्निजन्य खडकापासून तयार झालेल्या मृदेत संपन्न शेती होते; म्हणून अशी मृदा असलेले इंडोनेशियातील जावा बेट, जपान, सिसिली आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखी पर्वतांचे उतार व पायथ्याचे प्रदेश येथे लोकसंख्या केंद्रित झालेली दिसून येते.
(५) खनिजसंपत्ती किंवा भूगर्भ रचना: पृथ्वीच्या भूकवचा मधील खडकात मानवाला उपयोगी अशी अनेक खनिजे सापडतात. ही खनिजे मिळवण्यासाठी खाणींच्या जवळपास लोकवस्ती आढळून येते. जगाच्या काही भागात अन्य भौगोलिक घटक प्रतिकूल असूनही केवळ खनिज संपत्ती मुळे तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले दिसते. ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणीचा प्रदेश आणि मध्यपूर्व आशियातील खनिज तेल संपन्न देश ही याची उत्तम उदाहरणे आहेत.
(६) नैसर्गिक वने : अतिदाट वनांच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी असते. विषुववृत्तीय वने अतिशय दाट असल्यामुळे तेथे अत्यंत विरळ लोकवस्ती आढळते. उदा., ॲमेझॉनचे खोरे, काँगो नदीचे खोरे येथील विषुववृत्तीय सदाहरित वनांचा प्रदेश.
(७) प्रदेशाची सुगमता : ज्या प्रदेशात माणसाला सहजासहजी ये-जा करणे शक्य असते अशा सपाट, मैदानी व किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या अधिक असते. याउलट ज्या प्रदेशात ये-जा करणे कठीण असते अशा डोंगराळ व दुर्गम प्रदेशात लोकवस्ती कमी असते.
(८) प्रदेशाचे सापेक्ष स्थान : लोकसंख्या वितरणावर त्या क्षेत्राचे किंवा प्रदेशाचे सापेक्ष स्थान हा घटकही महत्त्वाचा ठरतो. काही प्रदेश बेटांवर असतात, काही प्रदेशांना द्वीपकल्पीय स्थान असते, तर काही देश हे पूर्णतः खंडांतर्गत असतात. याचाही परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होतो. बेटांच्या स्थानामुळे आंतरराष्ट्रीय संगीत प्राप्त होते. साहजिकच तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण आढळते. उदा., इंग्लंड, जपान व काही द्वीपकल्पीय देशांनाही साधारण अशाच स्वरूपाचे लाभ असल्यामुळे तेथे जास्त लोकसंख्या दिसून येते. उदा., भारत, दक्षिण कोरिया, बांगला देश इत्यादी. याउलट अफगाणिस्तान, नेपाळ अशा खंडांतर्गत प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते.
२) लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा.
उत्तर : प्रत्येक देशाची लोकसंख्या ही सर्वसाधारणपणे वाढतच असते. मात्र, लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येक देश एक विशिष्ट स्थित्यंतरातून जात असतो. या स्थित्यंतराच्या दरम्यान देशाची लोकसंख्या वाढ पाच टप्प्यातून जाते त्याला लोकसंख्यावाढीच्या संक्रमणाचे टप्पे म्हणतात.
जरी प्रत्येक देश या संक्रमणातून जात असला, तरी प्रत्येक देशातील संक्रमणाचे हे टप्पे वेगवेगळ्या कालखंडात घडून येतात. या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात प्रति हजारी ढोबळ जन्मदर आणि प्रति हजारी ढोबळ मृत्युदर हे दोन्ही दर सर्वाधिक असतात आणि सर्वसाधारणतः हे दर ३५ ते ४० च्यादरम्यान असतात. म्हणजेच, ढोबळ जन्मदर हा सुमारे ४० तर ढोबळ मृत्युदर हा सुमारे ३८ ते ४० च्यादरम्यान असतो. याचाच अर्थ जन्मदर आणि मृत्युदरातील तफावत फार कमी असते. एकंदरीत जास्त जन्मदर आणि जास्त मृत्युदर यामुळे एका अर्थी लोकसंख्या स्थिर असते आणि लोकसंख्येतील वाढ ही नगण्य असते किंवा लोकसंख्येत वाढ जवळ-जवळ होतच नाही.
त्यानंतरच्या तीन टप्प्यात लोकसंख्येच्या ढोबळ जन्मदरातील आणि मृत्युदरातील फरक हळूहळू वाढत जातो. सुरुवातीस जन्मदर जास्त आणि मृत्युदर कमी, नंतर जन्मदर जास्त आणि मृत्युदरात सातत्याने घट आणि त्यानंतर जन्मदरातही सातत्याने घट अशाप्रकारे तीन टप्पे पार पडतात.
शेवटच्या पाचव्या टप्प्यात ढोबळ जन्मदरात कमालीची घट दिसून येते. मात्र, तेव्हाच ढोबळ मृत्युदरातही कमालीची घट दिसून येते. या टप्यात ढोबळ जन्मदर व मृत्युदर हे सुमारे व प्रति हजारी ८ ते १० च्यादरम्यान दिसतात. थोडक्यात, या टप्प्यात पुन्हा एकदा पहिल्या टप्प्याप्रमाणे ढोबळ जन्मदर आणि मृत्युदर यातील फरक हानगण्य असतो. त्यामुळेच एका अर्थी लोकसंख्या स्थिर असते आणि लोकसंख्येतील वाढ ही नगण्य असते किंवा लोकसंख्येत वाढ होताना दिसत नाही.
३) चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील.
उत्तर: प्रत्येक देशाची लोकसंख्या ही सर्वसाधारणपणे वाढतच असते. मात्र, लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येक देश एक विशिष्ट स्थित्यंतरातून जात असतो. या स्थित्यंतराच्या दरम्यान देशाची लोकसंख्या वाढ पाच टप्प्यातून जाते त्याला लोकसंख्यावाढीच्या संक्रमणाचे टप्पे म्हणतात.
जेव्हा लोकसंख्या वाढीच्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून देश जात असतो, तेव्हा त्या देशात लोकसंख्येच्या विस्फोटाची स्थिती निर्माण झालेली असते. मात्र, या टप्प्यातून जेव्हा देश चौथ्या टप्प्यात जातो तेव्हा जन्मदर घटत जातो व मृत्युदरही घटत जातो. नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारते, वैदयकीय सेवासुविधा उपलब्ध असतात.. लोक आपल्या आरोग्याबद्दल जास्त जागरूक होतात, मात्र, अशा परिस्थितीत लोकसंख्येचा वृद्धिदरही कमी होतो आणि त्यामुळे कार्यरत लोकसंख्येचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. असे देश अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून राहतात. मनुष्यबळाचा अभाव या देशांना जाणवू लागतो आणि त्यामुळे अशा देशांमध्ये जगाच्या इतर भागातून येणाऱ्या लोकांच्या स्थलांतराचा कल वाढतो.
यापुढच्या पाचव्या टप्प्यात जेव्हा देश जातो, तेव्हा तर जन्मदर अजून घटत जातो, मृत्युदरही अजून कमी झालेला असतो. काही प्रसंगी तर मृत्युदर जास्त आणि जन्मदर कमी अशी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे देशामध्ये बालकांची संख्या खूपच कमी होते आणि वृद्धांची संख्या खूप वाढते. थोडक्यात, अशा परिस्थितीत या देशात अवलंबित लोकांची संख्या वाढते, कार्यरत लोकांचे प्रमाण कमी होते आणि याचा परिणाम सुरुवातीस चांगल्या आर्थिक राहणीमानाच्या स्वरूपात दिसून येतो. मात्र, भविष्यात या देशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते.
प्र. ५. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या.
उत्तर : (Rotate your phone)
प्र.६. जगाच्या आराखड्यात खालील बाबी दाखवा व सूची काढा.
अ. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश
आ. भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश
इ.लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील पाचव्या टप्प्यातील कोणतेही दोन देश,
ई. लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील दोन देश.
Rate This Study Storm


