१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय | इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी
१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय | इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी | 1. itihas lekhan paschatya parampara swadhyay

प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ........... यास म्हणता येईल.

उत्तर : आधुनिक इतिहासलेखनाचा जनक व्हॅालटेर यास म्हणता येईल.

(२) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ .......... याने लिहिला.

उत्तर : आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.


(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.

(१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - रिझन इन हिस्टरी

(२) लिओपॉल्ड व्हॉन रांके - द थिअरी ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी

(३) हिरोडोटस - द हिस्टरीज्

(४) कार्ल मार्क्स - डिसकोर्स ऑन द मेथड

उत्तर :

चुकीची जोडी : कार्ल मार्क्स - डिसकोर्स ऑन द मेथड

दुरुस्त जोडी : कार्ल मार्क्स - दास कॅपिटल


प्रश्न २. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

1) द्वंद्ववाद :

i) एखादया घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला 'द्वंद्ववाद' असे म्हणतात. जॉज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.

ii) दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच 'द्वंद्ववाद' असे म्हणतात.


2) ॲनल्स प्रणाली :

i) राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच 'ॲनल्स प्रणाली' असे म्हणतात.

ii) 'ॲनल्स' (Annals) म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे, तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी "ॲनल्स प्रणाली' फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.


३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

कारण - i) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

ii) स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला.

iii) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तसेच 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानल्या गेल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


(२) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

कारण -i) फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी 'आर्के ऑलॉजी ऑफ नॉलेज' या ग्रंथामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन केले.

ii) पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.

iii) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.


४. पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.

(१) इतिहासलेखन म्हणजे काय ?

उत्तर : इतिहास लेखन म्हणजे :

१) उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे.

२) त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.

३) उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे या पद्धतीने केलेले लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात.


(२) रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला ?

उत्तर : १) रेने देकार्त है फ्रेंच तत्वज्ञ होते.

२) इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे हे मत ते आग्रहाने मांडत होते.

३) एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशय रित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापी करू नये हे त्यांचे मत होते.


(३) व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे का म्हटले जाते?

उत्तर : वॉल्टेअर हे फ्रेंच तत्वज्ञ होते. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कार्यक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला आणि त्यादृष्टीने वॉल्टेअर इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते.


५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

image not fond

६. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

(१) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.

उत्तर : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने 'वर्गसंघर्षाचा सिद्धांत' मांडला. त्याच्या मते -

i) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.

ii) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.

iii) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो.

iv) उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.


(२) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर : आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये -

i) या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते.

ii) हे प्रश्न भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा-कहाण्यांशी जोडलेला नसतो.

iii) या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते.

iv) मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो.


(३) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?

उत्तर : i) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.

ii) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुष सीमाँ-द-बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.

iii) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.

iv) १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच 'स्त्रीवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.


(४) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.

उत्तर : लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन पुढीलप्रमाणे स्पष्ट केला आहे.

i) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्ताऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला.

ii) तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज शी ना मत यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

iii) अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

iv) इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर टीका करून जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्यांनी भर दिला.

Rate This Study Storm

Getting Info...

Post a Comment

Will try to reply you soon
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.