२. सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग - १

२. सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग - १ | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ | इयत्ता दहावी | Sajivantil jivanprakriya bhag 2 swadhyay

प्र.1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

अ . एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ................ रेणू मिळतात .

उत्तर :अ . एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण 38 रेणू मिळतात .

स्पष्टीकरण : 1. ग्लुकोज विघटन : ATP रेणू तयार होतात = 4 ATP रेणू वापरले जातात = 2

2. क्रेबचक्र : ATP रेणू तयार होतात = 2

3. ईटीसी अभिक्रिया : NADH , .10 NADH2 x 3ATP = 30ATP FADH2 . 2FADH2 x 2ATP = 4 ATP एकूण ATP रेणू तयार ( 4 + 2 + 34 ) = 40 ATP | वापरलेले ATP रेणू = 2 ATP | म्हणून एकूण ATP रेणू = 38 ATP .


आ . ग्लायकोलायसीसच्या शेवटी ...................... चे रेणू मिळतात.

उत्तर :आ . ग्लायकोलायसीसच्या शेवटी पायरुवेट चे रेणू मिळतात.

स्पष्टीकरण : ग्लायकोलायसीस किंवा ग्लुकोज - विघटन या पेशीद्रव्यात घडणाऱ्य प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुवेट पायरुविक आम्ल ) , ATP , NADH , आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन - दोन रेणू तयार होतात . यांपैकी पायरुवेट हे पुढच्या प्रक्रियेत भार्ग घेते .


इ . अर्धगुणसूत्री विभाजन भाग- 1 च्या पूर्वावस्थेतील ............... या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते .

उत्तर : इ . अर्धगुणसूत्री विभाजन भाग- 1 च्या पूर्वावस्थेतील स्थुलसुत्रता या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते .

स्पष्टीकरण : अर्धगुणसूत्री विभाजन भाग - । च्या पूर्वावस्थेत एकूण पाँच अवस्था असतात :

i ) तनुसूत्रता

ii ) युग्मसूत्रता

iii स्थूलसूत्रता

iv ) द्विसूत्रता

v ) अपंगती यांपैकी स्थूलसूत्रता या अवस्थेत जनुकीय विचरण होते .


ई. सूत्री विभाजनाच्या मध्याअवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात .

उत्तर :ई. सूत्री विभाजनाच्या मध्याअवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात .

स्पष्टीकरण : सूत्री विभाजनाच्या केवळ मध्यावस्थेतच सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात . त्यानंतरच्या अवस्थेत ती गुणसूत्रे दोन विरुद्ध ध्रुवांना जातात .


उ . पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपीडच्या च्या रेणूची आवश्यकता असते .

स्पष्टीकरण : मेदाम्लांपासून तयार झालेले फॉस्फोलिपीड नावाचे रेणू पेशींचे प्रद्रव्यपटल तयार करतात .


( ऊ ) आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी विनॉक्सिश्वसन प्रकारचे श्वसन करतात .

स्पष्टीकरण : जेव्हा शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासते , तेव्हा पेशींमध्ये विनॉक्सिश्वसन घडून येते . व्यायाम करताना अधिक ऊर्जा निर्मितीसाठी शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासते म्हणून व्यायाम करताना मांसपेशी विनॉक्सिश्वसन करतात .


प्रश्न . 2. व्याख्या लिहा :

( 1 ) पोषण : - पोषकद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात .

( 2 ) पोषकतत्त्वे : आपल्या पोषणासाठी आवश्यक असणारे कर्बोदके , प्रथिने , स्निग्धपदार्थ , जीवनसत्त्वे , खनिजे इत्यादी अन्नघटक म्हणजेच पोषकतत्त्वे होय

( 3 ) प्रथिने : अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला ' प्रथिन ' म्हणतात .

( 4 ) पेशीस्तरावरील श्वसन : अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्याविना झालेले ऑक्सिडीकरण होण्याची जी प्रक्रिया पेशीत चालते , त्या प्रक्रियेला पेशीस्तरावरील श्वसन असे म्हणतात .

( 5 ) ऑक्सिश्वसन : ऑक्सिजनचा वापर करून सजीवांमध्ये पेशीस्तरावर होणारे श्वसन म्हणजे ऑविसश्वसन होय .

( 6 ) ग्लायकोलायसीस : पेशीद्रव्यात घडणारी प्रक्रिया ज्यात , ग्लुकोजच्या एका रेणूचे | टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल , ATP , NADH , आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन | दोन रेणू तयार होतात .


प्रश्न 3. फरक स्पष्ट करा

अ. ग्लायकोलायसिस आणि क्रेब चक्र

ग्लायकोलायसिस क्रेब चक्र
१. ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया पेशी द्रव्यात होते. १. क्रेब चक्र तंतुकनिकेत होत असते .
२. ग्लुकोजचे रूपांतर पायरुवेटच्या दोन रेणूमध्ये होत असते . २. पायरूवेट चे रूपांतर CO2 आणि H2O मध्ये होते .
३. ग्लायकोलायसीस मध्ये ATP चे दोन रेणू वापरले जातात . ३. ATP चे रेणू वापरले जात नाहीत .
४. ग्लायकोलायसीस मध्ये ATP चे चार रेणू तयार होतात . ४. क्रेब चक्रामध्ये ATP वे दोन रेणू तयार तयार होतात .

आ. सूत्री पेशीविभाजन आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन

सूत्री पेशीविभाजन अर्धगुणसूत्री पेशीविभाजन
1.सूत्री पेशिविभाजानात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही . 1.अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते .
2. पुर्वावस्था जास्त काळाची नसते . 2. पुर्वावस्था जास्त काळाची असते .
3. सूत्री विभाजन काय पेशी आणि मुलपेशी अशा दोन्हीत होते . 3. अर्धगुणसूत्री पेशीविभाजन कायपेशीत होत नाही . केवळ मुलपेशीतच होते .
4 . हे पेशीविभाजन वाढ आणि विकासासाठी आवश्यक असते . 4. हे पेशीविभाजन युग्मके तयार करण्यासाठी आवश्यक असते

इ. ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन

ऑक्सिश्वसन विनॉक्सिश्वसन
1. ऑक्सिजनची गरज असते . 1. ऑक्सिजनची गरज नसते .
2. ऑक्सीश्वस्नात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते 2. विनॉविसश्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते .
3.ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते . 3. ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते .
4. ऑक्सिश्वसनात ATP चे 38 रेणू तयार होतात . 4.विनॉक्सिश्वसनात ATP चे 2 रेणू तयार होतात .

प्रश्न 4. शास्त्रीय कारणे लिहा .

अ . ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते .

करण :पेशीश्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णत : ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATP चे 38 रेणू निर्माण होतात . पेशीश्वसनामध्ये ग्लायकोलायसीस , क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया तीन प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात . जरअशा वेळी ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलायसीस ही प्रक्रिया होईल पण पुढच्या दोन प्रक्रिया होणार नाहीत . शिवाय ग्लायकोलायसीस जर ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोलनिर्मिती होईल . त्याचप्रमाणे ATP चे केवळ दोनच रेणू निर्माण होतील . शरीरासाठी ऊर्जापुरवठा कमी होईल . म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते .

पेशीश्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णत : ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATP चे 38 रेणू निर्माण होतात . पेशीश्वसनामध्ये ग्लायकोलायसीस , क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया तीन प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात . जरअशा वेळी ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलायसीस ही प्रक्रिया होईल पण पुढच्या दोन प्रक्रिया होणार नाहीत . शिवाय ग्लायकोलायसीस जर ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोलनिर्मिती होईल . त्याचप्रमाणे ATP चे केवळ दोनच रेणू निर्माण होतील . शरीरासाठी ऊर्जापुरवठा कमी होईल . म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते .


आ . तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे .

करण :आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही . परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते . तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते . म्हणून पालेभाज्या , फळे , धान्ये यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषकतत्त्व मानले जाते .


इ . पेशीविभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे .

पेशीविभाजन ही एक आवश्यक जीवनप्रक्रिया आहे . पेशीविभाजनामुळेच सजीवांची वाढ व विकास होते . शरीराची झालेली झीज भरून काढता येते . जखमा भरून येतात . पेशींची संख्या वाढू शकते . अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांत नवे जीव निर्माण होतात . लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवांत युग्मके तयार होतात . या साऱ्या कार्यांमुळे पेशीविभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे .


ई . काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सिश्वसन करतात .

करण :पेशीविभाजन ही एक आवश्यक जीवनप्रक्रिया आहे . पेशीविभाजनामुळेच सजीवांची वाढ व विकास होते . शरीराची झालेली झीज भरून काढता येते . जखमा भरून येतात . पेशींची संख्या वाढू शकते . अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांत नवे जीव निर्माण होतात . लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवांत युग्मके तयार होतात . या साऱ्या कार्यांमुळे पेशीविभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे .


उ. क्रेब चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात .

करण :क्रेब चक्र म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र हे सर हेन्झ क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते . ॲसेटिल - को - एन्झाइम- A चे रेणू ऑक्झॅलोअॅसेटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साहाय्याने रासायनिक क्रिया करतात . त्यामुळे हे चक्र सुरु होते . ऑक्झॅलोॲसेटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो . हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो . म्हणून क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात .


प्रश्न 5 . सविस्तर उत्तरे लिहा.

अ . ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर वर्णन लिहा .

उत्तर : (1) अन्नपदार्थांचे संपूर्ण पचन झाल्यानंतर त्यापासून ग्लुकोज ही शर्करा तयार होते . या त्यानंतर त्या ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होणे म्हणजे ग्लायकोलायसीस होय .

(2) ऑक्सीश्वसन आणि विनॉक्सिश्वसन या कार्यात ग्लायकोलायसीसची प्रक्रिया अनुक्रमे ऑक्सिजनच्या सोबत किंवा ऑक्सिजनशिवाय होते .

(3) ऑक्सिश्वसनच्या वेळी एका ग्लुकोजच्या रेणूपासून पायरूविक आम्ल , ATP NADH2 , आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन दोन रेणू तयार होतात .


आ ) आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा

image not fond

उत्तरः सूत्री विभाजनाचे दोन टप्पे असतात :

( अ ) प्रकल - विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन आणि ( ब ) परिकलविभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन .प्रकलविभाजन हे पूर्वावस्था , मध्यावस्था , पश्चावस्था व अंत्यावस्था या चार पायऱ्यांमध्ये पूर्ण होते .

( १ ) प्रकलविभाजन

( i ) पूर्वावस्था -

गुणसूत्राचे वलीभवन सुरू होते . मुळात गुणसूत्र नाजूक धाग्यासारखे असतात . परंतु ते आता सुरुवातीची पूर्वावस्था आखूड व जाड होतात . त्यांच्या अर्धगुणसूत्र जोड्या तयार होऊन त्या सहज दिसू लागतात . ताराकेंद्र द्विगुणित होऊन ते पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते . केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते .

सर्व गुणसूत्रांचे वलीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसते . सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाल समांतर अवस्थेत संरचित होतात . दोन्ही ताराकेंद्रे आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू यांदरम्यान विशिष्ट अशा लवचीक प्रथिनांचे धागे किंवा तुर्कतंतू तयार होतात . केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते

( iii ) पश्चावस्था

तुर्कतंतूच्या मदतीने गुणसूत्रबिंदूंचे विभाजन होते . प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते . वेगळी झालेली अर्धगुणसूत्रे आता जन्यगुणसूत्रे होतात . गुणसूत्रे केळीच्या घडाप्रमाणे भासतात . या पायरीच्या शेवटाला गुणसूत्रांचे दोन - दोन‌ संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचतात .

( iv ) अंत्यावस्था

पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडत जाऊन पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात . एका पेशीमध्ये आता दोन जन्यकेंद्रके तयार होतात . जन्यकेंद्रकांमध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात . तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात .

अशा तऱ्हेने प्रकलविभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होते . दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचांभोवती केंद्रकावरण तयार होते .

(ब) परिकलविभाजन

प्राणी पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते . पेशीद्रव्याचे विभाजन होऊन आता दोन नवीन जन्यपेशी तयार होतात . वनस्पती पेशीत खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होऊन परिकलविभाजनाने दोन नव्या जन्यपेशी तयार होतात .


इ . अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन करा .

उत्तर -

( i ) तनुसूत्रता -

image not fond

या सुरुवातीच्या अवस्थेत गुणसूत्रांचे घनीकरण सुरू होते . त्यामुळे ती जाडसर आणि ठळक होऊ लागतात .

( ii ) युग्मसूत्रता -

image not fond

या अवस्थेत सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जमू लागतात . याचबरोबर अनुबंधन म्हणजेच सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जवळजवळ असल्यासारख्या दिसू लागतात . या गुणसूत्रांत पारगती होण्यासाठी ' जटिल अनुबंध ' तयार होतो . प्रत्येक गुणसूत्राचा बाहू आता द्विभाजित होतो , मात्र त्याचा गुणसूत्रबिंदू विभागला जात नाही . त्यामुळे चतुर्बाहू असलेली ही रचना दिसू लागते .

( iii ) स्थूलसूत्रता -

image not fond

या अवस्थेत पारगतीची क्रिया पार पडते. सजातिय गुणसूत्रांच्या अर्धगुणसूत्री बाहूंची अदलाबदल या प्रक्रियेत होते. त्यामुळे जनुकीय विचरण घडून येते.

( iv ) द्विसूत्रता -

image not fond

या अवस्थेत ' जटिल अनुबंध ' उलगडले जातात . त्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकांपासून दूर जातात . या अवस्थेत इंग्रजी X प्रमाणे गुणसूत्रे भासतात . त्यांना कायझ्मा असे म्हणतात .

( v ) अपगती -

image not fond

ही पूर्वावस्था - । ची सर्वांत शेवटची अवस्था आहे . या अवस्थेत कायझ्मा उलगडला जातो आणि पारगती झालेली सजातीय गुणसूत्रे वेगळी होतात . केंद्रिका आणि केंद्रकावरण हळूहळू नाहीसे होऊ लागते .


ई . शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात ?

उत्तर -

( 1 ) प्रत्येक सजीवाच्या शरीरात निरनिराळ्या संस्था सतत समन्वयाने कार्य करीत असतात . मानवी शरीरात हा समन्वय अधिकच प्रगत असतो .

( 2 ) पचन संस्था , श्वसन संस्था , रक्ताभिसरण संस्था , उत्सर्जन संस्था , नियंत्रण संस्था आणि शरीरातील अंतर्गत व बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकांत असलेल्या समन्वयातून करीत असतात .

( 3 ) पचन संस्थेने शोषलेले अन्नघटक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी परिवहन संस्था हृदयाच्या साहाय्याने सतत कार्य करीत असते . त्याच्यासोबत श्वसन संस्थेने घेतलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यात येतो .

( 4 ) प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांत ऑक्सिजनच्या साहाय्याने अन्नघटकांचे ऑक्सिडीकरण करून सर्व कार्यांस लागणारी ऊर्जा मिळवली जाते .

( 5 ) या सर्व संस्थांची कार्ये चेता संस्थेच्या साह्याने नियंत्रित असतात . या सर्व क्रियांमुळे सजीव जिवंत राहू शकतो . त्याची वाढ व विकास होते .


उ . क्रेब चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा .

उत्तर -

( 1 ) क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्झ क्रेब यांनी शोधली . यालाच ' ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र ' किंवा ' सायट्रिक आम्लचक्र ' असेही म्हणतात .

( 2 ) ग्लायकोलायसीस प्रक्रियेत तयार झालेले अँसेटिल - को - एन्झाइम- A चे रेणू पेशीद्रव्यातील तंतुकणिकेमध्ये जातात.

( 3 ) तेथे क्रेब चक्र अभिक्रिया राबवली जाते .


( ऊ ) कर्बोदके , स्निग्धपदार्थ , प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळविण्याची प्रक्रिया कशी होते ? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा .

उत्तर -

( 1 ) सर्वप्रथम आहारातील कर्बोदकांचे पचन संस्थेतील विकारांच्या साहाय्याने पचन होऊन त्यापासून ग्लुकोज बनते . तसेच स्निग्धपदार्थांपासून मेदाम्ले व अल्कोहोल बनते . प्रथिनांपासून अमिनो आम्ले मिळतात .

( 2 ) कर्बोदकांचे पेशीश्वसनाने पूर्ण ऑक्सिडीकरण होते . ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे तीन टप्प्यांत ऑक्सिडीकरण होते . हे टप्पे- ग्लुकोज - विघटन , क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असे असतात .

( 3 ) ग्लुकोज - विघटन प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूपासून पायरूविक आम्ल , ATP NADH2 आणि पाणी या साऱ्यांचे प्रत्येकी दोन - दोन रेणू तयार होतात . या पायरूविक आम्लाचे रूपांतर अॅसेटिल - को - एन्झाइम- A या रेणूत होते . तसेच NADH2 व कार्बन डायॉक्साईडचे दोन रेणू तयार होतात .

( 4 ) याच्यानंतर क्रेब चक्राच्या टप्प्यात अॅसेटिल - को - एन्झाइम- A चे रेणू तंतुकणिकेत शिरतात . तेथे चक्रीय अभिक्रियेने अॅसेटिल भागाचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते व त्यात CO2 , H20 , NADH2 , FADH2 आणि ATP चे रेणू तयार होतात .

( 5 ) तिसऱ्या टप्प्यात , इ.टी.सी. प्रक्रिया होते . पहिल्या दोन टप्प्यांत तयार झालेले NADH½ आणि FADH , या रेणूंचा वापर ATP रेणू मिळवण्यासाठी केला जातो . प्रत्येक NADH रेणूपासून तीन आणि प्रत्येक FADH रेणूपासून दोन ATP रेणू तयार होतात .

( 6 ) अशा रीतीने ग्लुकोजच्या एका रेणूच्या संपूर्ण ऑक्सिडीकरणाने ATP चे 38 रेणू तयार केले जातात . कर्बोदकांपासून ऊर्जा अशी तयार होते .


Rate This Study Storm

Getting Info...

Post a Comment

Will try to reply you soon
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.