५. द्वितीयक आर्थिक क्रिया

५. द्वितीयक आर्थिक क्रिया | इयत्ता १२वी भूगोल | 5. dvitiyak aarthik kriya swadhyay

प्र.१. साखळी पूर्ण करा.

लघुउद्योग हाताने निर्मिती उद्योग चिनी मातीची भांडी बनविणे
कुटिरोद्योग कुशल कारागिर टाटा लोहपोलाद उद्योग
ग्राहकोपयोगी वस्तू वैयक्तिक मालकी कुंभार
खाजगी , क्षेत्र थेट वापरासाठी तयार औषधनिर्मिती

उत्तर :

लघुउद्योग कुशल कारागिर औषधनिर्मिती
कुटिरोद्योग हाताने निर्मिती उद्योग कुंभार
ग्राहकोपयोगी वस्तू थेट वापरासाठी तयार चिनी मातीची भांडी बनविणे
खाजगी, क्षेत्र वैयक्तिक मालकी टाटा लोहपोलाद उद्योग

प्र.२. योग्‍य सहसंबंध ओळखा.

(A : विधान, R : कारण)

१) A : मुंबई येथील दमट हवामान सुती वस्‍त्रोद्योगास पूरक आहे.

R : उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.

अ) फक्‍त A बरोबर आहे

ब) फक्‍त R बरोबर आहे.

क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण आहे.

ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण नाही.

उत्तर : ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण नाही.


२) A : भारतात औद्योगिक उत्‍पादनांमध्येविविधता आहे.

R : भारत हा कृषिप्रधान देश आहे.

अ) फक्‍त A बरोबर आहे

ब) फक्‍त R बरोबर आहे.

क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण आहे.

ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण नाही.

उत्तर : ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण नाही.


प्र.३. भौगोलिक कारणे लिहा.

१) उद्योगधंद्याचे वितरण असमान असते.

उत्तर : उदयोगांचे स्थान हे प्रामुख्याने कच्च्या मालाचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप आणि बाजारपेठ या तीन प्रमुख घटकांशी निगडित असते. अर्थात या घटकांशिवाय भांडवल, तंत्रज्ञान मनुष्यबळ, वाहतूक, शासकीय धोरण हे इतर घटकही तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. मात्र कच्चा माल हा पूर्णतः प्राकृतिक घटक असून, तो अवजड आहे की हलका आहे. तो नाशवंत आहे की टिकाऊ आहे. तो घटणाऱ्या वजनाचा आहे की शुद्ध स्वरूपाचा आहे. (म्हणजे वजनात फरक न पडणारा) यांवर उदयोगांचे स्थान अवलंबून असते. साहजिकच लोह-पोलादासारखा उदयोग हा लोहखनिज या घटत्या वजनाचा कच्चा माल असल्यामुळे तो खाणकाम क्षेत्राजवळच स्थापन झालेला दिसतो,

त्याचप्रकारे ऊस हा वजन घटणारा नाशवंत कच्चा माल असल्यामुळे साखर कारखाना ऊस उत्पादक क्षेत्राजवळच स्थापन झालेला दिसतो.

याउलट सुती वस्त्र उदयोग हा स्थानमुक्त उदयोग आहे. याला कारण कापूस हा कच्चा माल आणि कापड हा पक्का माल यांच्या वजनात फारसा फरक पडत नाही. अशाच प्रकारचा प्रभाव पक्क्या मालाच्या स्वरूपावरही दिसून येतो. कधी कधी पक्का माल नाशवंत असतो. उदा., बेकरी उत्पादने तर कधी पक्का माल हा खूप अवजड असतो. उदा., विविध फळांची पेये, असे उद्योग बाजारपेठेजवळ किंवा शहराजवळ स्थायिक होतात.

विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल मग तो कृषिक्षेत्रातून असेल किंवा खनिज क्षेत्रात असेल किंवा वनक्षेत्रातून असेल त्याचे वितरणही मुळात असमान असते. शिवाय त्यांची गुणवैशिष्ट्ये वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी असतात. साहजिकच या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून उदयोगांचे वितरणही असमान होते.


२) धनबाद या खनिजबहुल क्षेत्रात लोहपोलाद कारखाने स्‍थापन झालेले आढळतात.

उत्तर : भारतातील छोटा नागपूर पठारावर खनिजांचे विस्तृत साठे आढळतात. धनबाद हे छोटा नागपूर पठारावरील झारखंड राज्यातील प्रमुख शहर, जिल्ह्याच्या ठिकाणी वसलेले आहे. लोहपोलाद उदयोगासाठी लागणारा प्रमुख कच्चा माल लोह खनिज, मँगनीज तसेच कोळसा हे छोटा नागपुर पठारावर आढळतात. लोहखनिज हा वजन घटणारा कच्चा माल आहे. म्हणजेच, लोखंडावर प्रक्रिया केल्यावर मिळणारे उत्पादन म्हणजेच पोलाद हे तुलनेने कमी वजनाचे असते. म्हणून लोखंडाच्या प्रदेशातच लोह- पोलाद कारखाना स्थापन झालेला आढळतो. त्याच कारणामुळे धनबाद येथे लोहपोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात.


३) कोकणातील रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्‍ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्‍थापित झालेले आढळतात.

उत्तर : भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात समृद्ध नैसर्गिकसंपत्ती आढळते. या प्रदेशात आंबा, काजू, फणस, कोकम यांसारखी अनेक महत्त्वाची फळे पिकतात फळे ही नाशवंत असल्यामुळे त्यावर तातडीने प्रक्रिया करून त्यापासून उत्पादन मिळवणे आवश्यक असते.

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुबलक प्रमाणावर आंबा, काजू, फणस, कोकम या फळांचे उत्पादन होते आणि या उद्योगातून आंबा पेये, डब्बाबंद आंबारस, आटवलेला आंब्याचा रस, आंबावडी, आंबापोळी, फणसपोळी, फणसाचे तळलेले गरे, काजुगर, कोकम सरबत आमसुले अशी विविध उत्पादने मिळवली जातात. त्यामुळेच कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.


४) दक्षिण अमेरिकेत उद्योगांचा विकास मर्यादित आहे.

उत्तर : दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग ॲमेझॉन नदीच्या विस्तृत खोऱ्याने व्यापता आहे. त्याचबरोबर खनिजांनी समृद्ध अशा चिली, पेरू या पश्चिम किनारी देशांमध्ये सपाट मैदानी प्रदेशाची कमतरता आहे. स्थानिक लोकसंख्याही कमी असल्यामुळे स्थानिक बाजारपेठ मर्यादित आहे. दक्षिण अमेरिकेतील बहुतांश देश हे आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या पुरेसे विकसित नाहीत. या सर्व कारणांमुळे दक्षिण अमेरिकेत उद्योगांच्या विकासावर मर्यादा पडल्या आहेत.


५) मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास न होण्यामागे कोणते घटक जबाबदार आहेत?

उत्तर : ऑस्ट्रेलियात उद्योगाचा विकास ठराविक भागातच झालेला दिसतो. मध्य ऑस्ट्रेलियाचा विशाल प्रदेश हा पूर्णतः वाळवंटाने व्यापला आहे. स्थानिक लोकसंख्या येथे कमी आहे त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध नाही, कमी पर्जन्यमान, वाहतूक सुविधांचा अभाव या कारणांमुळेही उद्योगांच्या विकासासाठी पोषक परिस्थिती उपलब्ध नाही. त्यामुळे हे सर्व घटक मध्य ऑस्ट्रेलियातील उद्योगांचा विकास न होण्यामागे कारणीभूत आहेत.


प्र.४. टिपा लिहा.

१) स्‍थानमुक्‍त उद्योग

उत्तर : उदयोगाच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाची उपलब्धता आणि त्याचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप आणि बाजारपेठेचे सान्निध्य, हवामान, पाण्याची उपलब्धता यांसारखे प्राकृतिक घटक भांडवल, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ यांसारखे आर्थिक घटक आणि शासनाचे प्रोत्साहनपर शासकीय धोरण हे घटक परिणाम करतात. त्यामुळेच बहुतांशी प्रत्येक उद्योग आणि त्याचे स्थानिकीकरण हे कुठल्या तरी विशिष्ट कारणाशी निगडित असते. थोडक्यात बहुतांश उदयोग हे अनुकूल स्थानाच्या शोधात असतात. म्हणजेच स्थाननिवडीचे स्वातंत्र्य त्यांना नसते. उदा., लोहपोलाद उद्योग हा खाणींच्या प्रदेशाजवळच आढळतो, तर साखर उद्योग हा ऊस उत्पादन क्षेत्राजवळच आढळतो.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही उद्योगांना मात्र स्थाननिवडीचे स्वातंत्र्य असते, अशा उद्योगांना स्थानमुक्त उद्योग असे म्हणतात. काही प्रमाणात कच्च्या मालाच्या स्वरूपावरही स्थानमुक्त उद्योग ठरतात. कापूस या कच्च्या मालावर अवलंबून असलेला वस्त्रोक्ष्योग हा एकाअर्थी स्थानमुक्त उदयोग आहे. याला कारण कापसाचे वजन आणि त्यापासून निर्माण होणान्या वस्त्रांचे वजन यति फारसा फरक पडत नाही. त्यामुळे हा उद्योग आता जगभरात कुठेही स्थापित करता येऊ शकतो. या उदयोगाला लागणारे दमट हवामान आता तंत्रज्ञानाच्या आधारे कृत्रिम रीत्याही तयार करता येते. अशाचप्रकारे या उद्योगातून तयार होणारा पक्का माल हा खूप मूल्यवान किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित असतो. असे उदयोगही स्थानमुक्त उदयोग असतात आणि ते कुठेही बसवता येतात. उदा., हिन्यांना पैलू पाडणे, जडजवाहिराचे दागिने तयार करणे, माहिती-तंत्रज्ञान संदर्भात विविध वस्तूंचे उत्पादन आणि जुळवणी करणे हे सर्व स्थानमुक्त उद्योग आहेत.


२) सार्वजनिक उद्योग

उत्तर : उद्योगाचे विविध प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यांपैकी मालकीच्या आधारे उद्योगांचे वर्गीकरण केल्यास सार्वजनिक उद्योग, खाजगी उदयोग, सहकारी उद्योग, संमिश्र उद्योग असे विविध प्रकार आढळतात. त्यांपैकी सार्वजनिक उदयोग हे एक महत्त्वाचे वर्गीकरण आहे. जे उद्योग पूर्णतः राज्य किंवा केंद्र शासनाच्या मालकीचे असतात. म्हणजे ज्या उदयोगात भांडवलाची गुंतवणूक ही पूर्णतः सरकारची असते, अशा उद्योगांना सार्वजनिक उद्योग म्हणतात.

आर्थिक विकासाच्या सुरुवातीला कमी आर्थिक बळामुळे खासगी गुंतवणूक कमी होते, अशा वेळेस सरकारलाच गुंतवणूक करून उदयोगांना प्रोत्साहन द्यावे लागते. त्याचबरोबर काही उद्योगांमध्ये नफाक्षम कालावधी सुरू होण्याचा काळ हा खूप दीर्घ असतो. इतका वेळ थांबण्याची तयारी खासगी उद्योजकांचे नसते. त्यामुळेही अशा उद्योगात सार्वजनिक क्षेत्राला उतरावे लागते.

संरक्षण, रेल्वे, पेट्रोकेमिकल्स अशा काही महत्त्वपूर्ण उद्योगात सरकारही सुरुवातीस खाजगी क्षेत्रात खुली सूट देऊ इच्छित नाही. अशा विविध कारणांमुळे अनेक देशांत सार्वजनिक उद्योग आढळतात. लोहपोलाद उदयोग, बहुउद्देशीय धरण बांधणी, वीजनिर्मिती प्रकल्प, रेल्वे वाहतूक बांधणी, दळणवळण, संदेशवहन, संरक्षण साहित्य व दारुगोळा उत्पादने इत्यादी उदयोग हे प्रामुख्याने सार्वजनिक उदयोग असतात. मात्र जगातील बहुतांश देशांनी आता या उद्योगातही खाजगी क्षेत्राला सामावून घेण्याचे धोरण अवलंबलेले दिसते.


३) अनुमापी अनुकूलता

उत्तर : उदयोगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या काही प्रमुख सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखादा मोठा उद्योग प्रदेशात स्थापित होतो. उदा., लोहपोलाद एकदा अशाप्रकारे उद्योग स्थापित झाला की, या मोठ्या उदयोगावर आधारित, त्यावर अवलंबून असणारे आणि या उद्योगाच्या सान्निध्यात अवलंबून असणारे पूरक किंवा साहाय्यक इतर अनेक उदयोग अशा केंद्राकडे आकर्षित होतात यालाच अनुमापी अनुकूलता असे म्हणतात. उदा., लोहपोलाद कारखाना सुरू झाल्यानंतर त्यातून उत्पादित होणाऱ्या पोलाद या पक्क्या मालावर आधारित भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग तयार करणे, गाड्यांचे सांगाडे निर्मिती, मोटार गाड्या निर्मिती, यंत्रनिर्मिती असे विविध उदयोग स्थापित होताना दिसतात.

लोहपोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणामुळे उद्योगांना लागणाऱ्या विविध पायाभूत सेवा-सुविधा तेथे आधीपासूनच उपलब्ध असतात. या अनुकूलतेचा फायदा उठवून कमी भांडवलात अशा पूरक उद्योगांना सहजपणे आपला जम बसवता येतो. एका अर्धी अनुमापी अनुकूलतेमुळे उद्योगांना केंद्रित करण्यास प्रोत्साहन मिळते. त्यातूनच भविष्यात तेथे औद्योगिक पाण्याची निर्मिती होते.


४) वाहतुकीची उद्योगाच्या विकसातील भूमिका

उत्तर : कच्चा माल उदयोगधंद्यांच्या ठिकाणी आणण्यासाठी व तयार झालेल्या पक्का माल बाजारपेठेत पाठवण्यासाठी वाहतूक आवश्यक असते वाहतुकीच्या खर्चाचा उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर व विकासावर परिणाम होतो, रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग हे वाहतुकीचे मार्ग आहेत. या सर्व मार्गात जलमार्गाने होणारी वाहतूक कमी खर्चाची असते. त्यामुळेच धातू, खनिजे, कोळसा, कच्चे खनिज तेल यांची वाहतूक प्रामुख्याने जलमार्गाद्वारे केली जाते. साहजिकच अनेक उदयोग हे नैसर्गिक बंदराजवळ स्थायिक झालेले दिसतात. असाच प्रभाव देशांतर्गत उदयोगाच्या स्थानिकीकरणावर होताना दिसतो. जेथे अंतर्गत जलवाहतूक उपलब्ध आहे, तेथे उदा., पंचमहासरोवराचा प्रदेश उद्योगाच्या विकासावर खूप मोठा प्रभाव पडतो.

जलमार्ग नंतर लोहमार्ग हे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर आणि विकासावर प्रभाव पाडतात. विशेषतः जेथे दोन किंवा अधिक रेल्वेमार्ग एकत्र येतात अशा रेल्वेजंक्शनजवळ उदयोग स्थायिक झालेले आढळतात. जेणेकरून त्या उदयोगांना लागणारा सर्व प्रकारचा कच्चा माल, मनुष्यबळ, यंत्रसामग्री सहजतेने त्याठिकाणी पोहोचते उद्योगातून सामान बाजारपेठेपर्यंत लवकरात लवकर जाणेही आवश्यक असते. त्यामुळेच उद्योग आणि बाजारपेठ यांमधील वाहतुकीच्या सेवांचा विकासही तितकाच महत्त्वाचा असतो.


प्र.५. फरक स्‍पष्‍ट करा.

१) वजनाने हलक्‍या होणाऱ्या पक्‍क्‍या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्‍क्‍या मालाचे उद्योग

वजनाने हलक्‍या होणाऱ्या पक्‍क्‍या मालाचे उद्योग
वजनाने जड होणाऱ्या पक्‍क्‍या मालाचे उद्योग
१) ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या उत्पादनाचे वजन हे मूळ कच्च्या मालापेक्षा कमी होते, त्यांना वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग म्हणतात. १) ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या उत्पादनाचे वजन है मूळ कच्च्या मालापेक्षा जास्त होते, त्यांना वजनाने जड़ होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग म्हणतात.
२) अशा प्रकारचे उद्योग हे कच्च्या मालाच्या प्रदेशात स्थापित होतात. २) अशा प्रकारचे उद्योग हे बाजारपेठे जवळ अथवा वाहतूक केंद्रालगत स्थापित होतात.
३) बहुतांशी धातुउद्योग हे वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग असतात. ३) बहुतांश अन्नप्रक्रिया उद्योग, तयार खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग आणि बेकरी उदयोग हे वजनाने जड़ होणाऱ्या पक्क्या मालाचे उदयोग असतात.
४) उदा. लोहपोलाद, साखर उद्योग इ. ४) उदा. बेकरी.

२) प्राथमिक व द्‌वितीयक व्यवसाय

प्राथमिक व्यवसाय
द्‌वितीयक व्यवसाय
१) प्राथमिक व्यवसाय हे मानवाचे मूळ आर्थिक व्यवसाय होत. १) प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून अधिक टिकाऊ आणि उपयुक्त वस्तू बनवण्याच्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात.
२) प्राथमिक व्यवसायातून मानवाची अन्नाची मूळ गरज भागते, मात्र त्याचबरोबर इतर अनेक प्रकारचा कच्चा माल किंवा वस्तू मिळतात. २) या उदयोगात आणि कारखान्यात आधुनिक तंत्रज्ञान, तसेच यांत्रिकीकरण यांच्या साहाय्याने खूप मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालावर उत्पादन प्रक्रिया करून त्यापासून विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात.
३) प्राथमिक व्यवसाय हे जागतिक स्वरूपाचे व्यवसाय असून, जगातील बहुतांशी प्रत्येक देशात प्राथमिक व्यवसाय केले जातात. ३) द्वितीयक व्यवसायांचे स्थान हे प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते.
४) थोडक्यात, प्राथमिक व्यवसाय द्वितीयक व्यवसायांसाठी आवश्यक असा कच्चा माल पुरवतात. ४) द्वितीयक व्यवसायातून तयार होणाऱ्या उत्पादनांचे उपयुक्तता मूल्य जास्त असते, तसेच या वस्तू तुलनेने जास्त काळ टिकाऊ असतात.

३) अवजड व हलके उद्योग

अवजड उद्योग
हलके उद्योग
१) जे उद्योग प्रामुख्याने पायाभूत किंवा मूलभूत वस्तूंचे उत्पादन करतात, ज्यावर इतर अनेक उदयोग अवलंबून असतात, अशा उदयोगांना अवजड उदयोग म्हणतात. १) जे उद्योग ग्राहकांना प्रत्यक्ष वापरायोग्य वस्तूंचे उत्पादन करतात, अशा उदयोगांना हलके उद्योग म्हणतात.
२) खूप जास्त भांडवलाच्या गरजेमुळे बहुतांश अवजड उदयोग हे सार्वजनिक मालकीचे असतात. २) हलक्या उद्योगांची भांडवलाची गरज कमी असते.
३) अवजड उदयोगांची नफाक्षम होण्याची कालमर्यादा खूप जास्त असते. ३) बहुतांश हलके उदयोग है खाजगी मालकीचे असतात.
४) या उद्योगास लागणारा कच्चा माल व तयार होणारा पक्का माल दोन्ही अवजड असतात. ४) या उद्योगास लागणारा कच्चा माल व तयार होणारा पक्का माल दोन्ही हलके असतात.

प्र.६. खालील प्रश्नांची उत्‍तरे लिहा.

१) उद्योगांच्या‍ स्‍थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्‍पष्‍ट करा.

उत्तर : उदयोगांच्या स्थानिकीकरणावर पुढील प्राकृतिक घटक परिणाम करतात.

(१) कच्चा माल कोणत्याही उदयोगधंदयाला कच्च्या मालाची आवश्यकता असते. कच्च्या मालाच्या स्वरूपावर उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण अवलंबून असते. काही कच्चा माल हा विशिष्ट स्थानी क्षेत्रातून उपलब्ध होतो. अशा कच्च्या मालावर आधारलेले उद्योगधंदे स्थानिक क्षेत्रात स्थापन करावे लागतात. उदा., लोह-पोलाद उदयोगधंदे हे लोखंडाच्या क्षेत्रात आढळून येतात. याला कारण लोहखनिज हा अवजड शिवाय वजन घटणारा कच्चा माल आहे.

ज्या उद्योगधंद्याला लागणारा कच्चा माल शुद्ध स्वरूपाचा असतो, असे उदयोगधंदे बाजारपेठेच्या ठिकाणीदेखील उभारले असल्याचे आढळून येते. उदा., कापडगिरण्या पूर्वी मुंबई येथे होत्या. ज्या उद्योगधंद्यांना अवजड सामान लागते व त्यांचे पक्क्या मालात रूपांतर होताना त्यांच्या वजनात घट होते. असे उदयोग कच्च्या मालाच्या क्षेत्रातच उभारले जातात. उदा., पोलाद उदयोग, सिमेंट उद्योग. नाशवंत कच्च्या मालावर ठरावीक कालावधीत प्रक्रिया होणे जरुरीचे असल्यामुळे, असे उद्योगधंदे च्या मालाच्या क्षेत्रातच उभारले जातात. उदा., दुधावर प्रक्रिया करणारे दुग्धोत्पादक उदयोगधंदे, कृषी मालावर प्रक्रिया करणारे अन्नप्रक्रिया उदयोग, उसावर प्रक्रिया करणारा साखर उद्योग.

(२) सपाट जमीन : उदयोगांना कारखान्यांच्या उभारणीसाठी व विकासास सपाट जमीन आवश्यक असते. यामुळे कच्चा माल यंत्रसामुग्री यांची वाहतूकही सुलभ होते.

(३) ऊर्जा साधने : सर्वे उद्योगधंदयांना ऊर्जा साधने आवश्यक असतात. ज्या प्रदेशात स्वस्त व मुबलक ऊर्जा साधने सहजगत्या उपलब्ध होतात, त्या प्रदेशात उद्योगधंदे स्थापन करणे सोयीचे व फायद्याचे ठरते. कोळसा, जलविद्युत शक्ती, खनिजतेल, अणुशक्ती ही प्रमुख ऊर्जा साधने आहेत. काही उद्योगधंदयांना कोळशाची जास्त आवश्यकता असते. लोह-पोलाद उद्योगात कोळशाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो म्हणून त्याचे स्थानिकीकरण कोळशाच्या खाणीजवळ होते. उदा., भारतातील दुर्गापूर हे लोहपोलाद निर्मितीचे केंद्र, ओडिशातील ॲल्युमिनियम उत्पादन केंद्र कोळसा क्षेत्रात आहे.ज्या प्रदेशात कोळसा उपलब्ध नसतो, पण जलविद्युत उपलब्ध असते, अशा प्रदेशात जलविद्युत निर्मिती केंद्राच्या आसपास उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण होते. उदा., मुंबई येथील रासायनिक उद्योगांना खोपोली व कोयना वीज केंद्रातून विजेचा पुरवठा होतो.

(४) हवामान : काही उद्योगांना विशिष्ट प्रकारचे हवामान लागते. उदा., वस्त्रोदयोगाला दमट हवामान, तर सिमेंट उद्योगाला कोरडे हवामान आवश्यक असते. केवळ असे उद्योग विशिष्ट हवामान असलेल्या प्रदेशात स्थायिक झालेले आढळतात. नव्याने आलेले इलेक्ट्रानिक्स व संगणक सॉफ्टवेअर उदयोगही शुद्ध थंड हवेच्या प्रदेशात जास्त वेगाने वाढलेले दिसतात. उदा., बेंगलोर, हैदराबाद, पुणे.

(५) पाणीपुरवठा : उत्पादन प्रक्रियासाठी काही उदयोगांना भरपूर प्रमाणात पाणी लागते, असे उद्योग नदीकिनारी स्थायिक झालेले आढळतात. उदा., लोह-पोलाद, कागद निर्मिती.


२) साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्‍पष्‍ट करा.

उत्तर : साखर उद्योग हा एक प्रमुख कृषी आधारीत उदयोग असून, हा मोठा उद्योग म्हणून म्हटला जातो. यात भरपूर गुंतवणूक लागते. भारतामध्ये हा उद्योग बहुतांशी सहकारी तत्त्वावर चालतो. जगभरात साखर उदयोग हा प्रामुख्याने ऊस आणि बीटरूट या कच्च्या मालावर आधारित उदयोग आहे. साखर उद्योगावर पुढील घटक परिणाम करतात .

(१) कच्चा माल : साखर उद्योगाला ऊस किंवा बीटरूट हा कच्चा माल लागतो. बहुतांश उष्णकटिबंधीयदेशांत साखर उद्योग हा ऊस आधारित उदयोग आहे. ऊस आणि बीटरूट हे दोन्ही नाशवंत कच्चा माल असून, तोडणीनंतर लवकरात लवकर त्याच्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. साहजिकच साखर उद्योग हा कच्ची मालाच्या उत्पादन प्रदेशातच आढळतो.

(२) वाहतूक सुविधा : साखर उद्योगाला लागणारा कच्चा माल अवजड स्वरूपाचा कच्चा माल आहे. त्याचबरोबर उदयोगातून तयार झालेली साखर बाजारपेठेपर्यंत किंवा निर्यातीसाठी बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रगत वाहतूक सुविधांची आवश्यकता असते.

(३) अर्धकुशल आणि अकुशल मजूर : साखर उद्योगास भरपूर प्रमाणात मजूर पुरवठा लागतो. त्यामुळे ज्या प्रदेशात मजुरांची उपलब्धता असते. तेथे साखर उदयोग विकसित होतो अन्यथा अर्धकुशल किंवा अकुशल मजुरांचा पुरवठा करावा लागतो.

(४) साठवणक्षमता : कारखान्यातून तयार झालेली साखर विक्री होईपर्यंत नीट साठवून ठेवावी लागते. त्याला कारण अशा साखरेस पावसाचे पाणी व पुरापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे अशा साठवणक्षमतेसाठी खूप मोठी गोदामे बांधणे आवश्यक असते.

(५) विस्तृत जमीन : साखर उद्योगास विस्तृत जमीन लागते. कारखान्याची बांधणी, कापून आणलेल्या ऊसाची चढ-उतार आणि तयार साखरेची साठवणूक यांसाठी विस्तृत जमीन लागते.

(६) वीज पुरवठा : साखर उद्योगास वीज पुरवठा लागतो. काही प्रमाणात काही साखर कारखाने उसाच्या चिपाडापासून आपली स्वतःची वीजनिर्मिती करतात, मात्र हे प्रमाण खूप कमी आहे.

(७) भांडवल : साखर उद्योगाला भांडवल गुंतवणुकीची गरज असते. भारतातील बहुतांशी साखर उदयोग हे सहकारी तत्त्वावर चालवले जातात. ज्यात ऊस उत्पादक शेतकरी हेच कारखान्याचे भागधारक असतात आणि या कारखान्यातून मिळणाऱ्या नफ्यात ते वाटेकरी असतात.


३) मध्य ऑस्‍ट्रेलियातील उद्योगांच्या मर्यादित विकासास जबाबदार असणारे घटक सविस्तरपणे स्पष्ट करा.


प्र.७. खालील माहिती नकाशात भरून योग्‍य सूची द्या.

१) ऱ्हूर औद्योगिक क्षेत्र

२) जपानमधील एक औद्योगिक क्षेत्र

३) दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र

४) ऑस्‍ट्रेलियामधील एक औद्योगिक क्षेत्र

५) पंचमहासरोवरांजवळील औद्योगिक क्षेत्र

study storm

Rate This Study Storm

Getting Info...

Post a Comment

Will try to reply you soon
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.